About Us

नमस्कार! मराठी बूक कट्टा मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

मराठी बूक कट्टा ही वेबसाइट सुरू करण्याची कल्पना माझ्या मनात  साधारण २०२३ मध्येच आली. माझी वाचनाची सुरुवात ही २०१९ मध्ये झाली. पण या काही वर्षात एक गोष्ट जाणवली की मराठी साहित्यातील केवळ काहीच लेखकांची माहिती आपल्याला असते. पण या साहित्यविश्वात असे किती तरी लेखक आहेत, ज्यांचे लेखन हे वाचण्यासारखे व वाखाणण्याजोगे आहे. पण माहितीच्याअभावे त्या लेखकांपर्यंत, त्याच्या साहित्यापर्यंत पोहोचणे अवघड होऊन जाते. त्यामुळे या गेल्या काही वर्षात मी विविध साहित्य वाचण्याचा प्रयत्न केला, वाचून त्यांची समीक्षा सर्वप्रथम लिहिली आणि मगच मराठी बूक कट्टाचा जन्म झाला.

मराठी बूक कट्टा ही एक अशी वेबसाइट आहे ज्यात तुम्हाला मराठी कथा, कादंबरी, गूढकथा, भयकथा, ललित, नाटक, कवितासंग्रह, विनोदी या सोबतच सेल्फ-हेल्प, इत्यादि पुस्तकांचे समीक्षण मिळेल. यातील प्रत्येक पुस्तक हे मी स्वतः वाचलेलं असेल, त्यामुळे प्रत्येक पुस्तकाचे समीक्षण करताना माझे वैयक्तिक मत ही मी यात देणार आहे जेणेकरून योग्य पुस्तक निवडायला तुम्हाला मदत होईल.

इंग्रजी साहित्याची माहिती सध्याच्या जगात सगळीकडे उपलब्ध आहे, परंतु दुर्दैवाने मराठी भाषा ही इतकी समृद्ध असूनही काही निवडक ठिकानहूनच आपल्याला त्याची माहिती मिळते. एक वाचक म्हणून आवडीचे पुस्तक निवडताना, त्यातही मला हव्या असलेल्या किमतीत मला ते मिळेल का? आणि हे पुस्तक नक्की माझ्यासाठी योग्य आहे का? असे नाना प्रकारचे प्रश्न मला भेडसावत असत. यामुळेच एक वाचक म्हणून येणाऱ्या सगळ्या समस्या माहीत असल्याने त्या समस्या सोडवण्याचा माझा उद्देश्य आहे. मराठी वाचकांचा वर्ग मोठा आहे. मराठी भाषेचा गोडवा तुम्हा आम्हा सर्वांनाच माहीत आहे. अगदी संत ज्ञानेश्वरांनी ही “माझ्या मराठीची बोलू कौतुके l परि अमृतातेही पैजासी जिंके l ऐसी अक्षरे रसिके l मेळवीन ll  या ओवीत कौतुक केलं आहे. यावरूनच मराठी भाषेची थोरवी आपल्याला कळते.

प्रत्येक मराठी वाचकाला  साहित्य निवडताना येणाऱ्या अडचणी सोडवून, जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त वाचकवर्ग तयार करून, मराठी साहित्य प्रत्येक वाचनप्रेमी पर्यन्त पोहोचवण्याचा मानस आमचा आहे. अर्थात, यात तुमचा सहभाग ही आवश्यक आहे.

तर चला, प्रत्येक वाचन प्रेमींपर्यंत मराठी साहित्या पोहोचवूयात! मराठी भाषेला, मराठी साहित्याला एक समृद्ध वाचकवर्ग मिळवून देऊयात! आशा आहे की तुम्ही यात मनापासून सहभागी व्हाल.

धन्यवाद!