इंटिमेट – व. पु. काळे l Intimate – V. P. Kale l Marathi Kathasangrah Review

पुस्तक इंटिमेटलेखक व. पु. काळे
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या १२८ मूल्यांकन ५ / ५

व. पु. काळे म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. ना तर केवळ शिक्षणात परंतु इतरही अनेक क्षेत्रांमध्ये, कलांमध्ये ते पारंगत आहेत. त्यातलीच एक कला म्हणजे लेखनकला होय. प्रत्येक लेखकाची शैली ही वेगवेगळी असते. काहींचं लेखन हे सहज समजतं, काहींचं लेखन रुचायला अवघड जातं. पण शेवटी त्याचा मतितार्थ ही आपल्याला समजतोच. या ही पलीकडे काही लेखकांचं लेखन हे विचार करायला भाग पाडतं. मी तर असं म्हणेल की व. पुं. चं लेखन म्हणजे या तिन्ही विचारधारांचं एकत्रित मिश्रण होय. एक गोष्ट मला माझ्या वाचनातून जाणवली की आपण कितीही टाळलं तरीही वाचनाच्या शेवटी व. पुं. चं लेखन हे विचार करायला भाग पाडतंच; आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे व. पु. काळेंनी लिहिलेला “इंटिमेट” हा कथासंग्रह होय.

आयुष्यात अनेक माणसं येतात आणि जातात ही. काहींच्या आठवणीत आपण जगतो, तर काहींच्या आठवणी आपण सहज विसरून ही जातो. त्या आठवणी सहज विरून जातात इतक्या कच्च्या आठवणी असतात त्या. वाटेत भेटणारा प्रत्येक माणूस हा आपला मित्र बनेलच असे नाही, पण असतात काही आपल्यासारखी माणसं ज्यांना माणसाच्या केवळ सोबत असण्यापेक्षा त्या माणसाचा संपूर्ण सहवास हवासा वाटतो. आणि एकदा की तो माणूस आपल्याला भेटला की तो आपला “इंटिमेट” होऊन जातो. व. पु. काळेंच्या इंटिमेट

या कथासंग्रहात ही अशाच काही कथा आहेत की ज्या आपल्याला इंटिमेटया शब्दाचा वेगळ्या पद्धतीने अर्थ सांगतात. आपल्या आयुष्यात कितीतरी माणसं येतात-जातात पण प्रत्येकजण आपला इंटिमेट होत नाही. कारण जगातली प्रत्येक व्यक्ती ही आपली इंटिमेटअसावी हे गरजेचं नसतं, पण जी व्यक्ती इंटिमेटआहे तिचे नी आपले ऋणानुबंध हे अतिशय घट्ट असतात.

व. पु. काळेंच्या लेखनाचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी प्रत्येक माणसाच्या चरित्राचा, व त्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास यात केलेला दिसतो. यासोबतच, वेगवगेळया माणसाचे स्वभाव ही वेगवेगळेच; इथे प्रत्येकाचेच सुत जुळेल असे नाही. काहींचं नातं तुटतं तर काहींचं नातं नव्याने जुळतं. काही नाती निरर्थक असतात तर काही नाती आयुष्याला कलाटणी देतात तर काही नाती ही आयुष्याला नव्याने अर्थ देतात.

व. पु. काळेंच्या इंटिमेट

या कादंबरीत कोण कोणाच्या आयुष्यात कसं परिवर्तन घडवतं ते कळतं. मग ते शरीरसुखासाठी कुणाच्या तरी आयुष्याची राख रांगोळी करणे असो वा मनाचा ठाव ही न लागू देता स्वतःचे आयुष्य संपवणे असो. या सर्व घटनांमुळे समोरच्या व्यक्तीचं आयुष्य कोणते वळण घेतं ते आपल्याला यातून कळतं. यात दु:खी किंवा पीडित व्यक्तीचा कोणी ना कोणी इंटिमेटआहेच. पण ज्या व्यक्तीने दु:ख नसतानाही आपल्याला इंटिमेट मानलं, आणि आयुष्याचा शेवट होऊनही आपल्याला हे माहीतच नसतं की आपण त्या व्यक्तीची इंटिमेटअसतो. असं वाटतं जी आपलंच काहीतरी चुकलंय, आपणच कमी पडलोय, आणि मनाला आयुष्यभर त्याची खंत वाटते. या कथासंग्रहातून आपल्याला नात्यांचं महत्व कळतं.

आपण ही कुणाचे तरी इंटिमेटआहोत, कुणी ना कुणी आपला इंटिमेटआहे. चला, तर आजपासून आपण आपल्या इंटिमेटव्यक्तीला जपूया!

धन्यवाद!

Leave a Comment