मॅनिफेस्ट: सर्वश्रेष्ठ जीवन जगण्याच्या ७ पायऱ्या – रॉक्सी नफूसी l Manifest- 7 Steps to living your best life – Roxie Nafousi l Self-help book review

पुस्तक मॅनिफेस्टलेखक रॉक्सी नफूसी
प्रकाशन Penguin Random House UKसमीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या १९२ मूल्यांकन ४ /५

स्वप्न कुणाला पूर्ण करायची नसतात? आयुष्यात प्रत्येकाचीच काही ना काही ना काही स्वप्ने असतात. काहींची छोटी तर काहींची मोठी असतात. त्याने काही फरक पडत नाही, कारण स्वप्न ही स्वप्न असतात मग ती छोटी असो व मोठी. प्रत्येकासाठी ती महत्वाची असतात. तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुम्हाला तुमची एखादी इच्छा पूर्ण करायची आहे, तुमचं एक स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे; पण ज्यावेळी तुम्ही त्या स्वप्नाच्या दिशेने पाऊल उचलता तोच तुम्ही थांबता आणि मनात अनेक शंका- कुशंका निर्माण होतात. “मी हे करू शकेल का?” “मला हे जमेल का?” इत्यादि, एकूणच भीती, नकारात्मक भावना, शंका-कुशंका, आत्मविश्वासची कमतरता या गोष्टी तुम्हाला थांबवतात. घाबरू नका, कारण या पुस्तकाच्या लेखिकेसोबत ही असंच झालंय. हे होणं अगदी साहजिक आहे, पण यामुळे स्वप्न न पाहणं, खचून जाणं हे अगदी चुकीचं आहे आणि आपण नेमकं इथेच चुकतो. मी या आधी ही इंग्रजीतील एक पुस्तक वाचलं आहे पण हे सेल्फ-हेल्पचं एक असं पुस्तकआहे जे प्रत्येकाने, प्रत्येक वयोगटातील, मग ती व्यक्ती वयाच्या कोणत्याही गटात असो त्याने हे वाचलंच पाहिजे. कारण स्वप्नांना वय नसतं!

मॅनिफेस्ट हे पुस्तक रॉक्सी नफूसी यांनी लिहलेलं एक अतिशय उत्तम पुस्तक आहे. यामध्ये सुरुवातीला त्यांनी त्यांच्या आयुष्याची गोष्ट व तसेच अनुभव सांगितले आहेत. त्या ही आपल्या सारख्याच स्वतःशी संघर्ष करत होत्या, आयुष्याची सुरुवात कुठून करावी हे त्यांना कळेनाच. मग त्यांनी असंच एकदा मॅनिफेस्टशन या विषयावर एक विडियो पाहिली, आणि त्यांनंतर त्यांचं आयुष्यच बदललं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट असतोच, तसाच हा लेखिकेच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता. हे पुस्तक केवळ १५० पानांचं आहे. यात स्वप्नांबद्दलची आपली परिकल्पना पूर्णतः बदलून टाकतं. स्वप्नांसाठी पहिलं पाऊल टाकताना आपल्याला अर्थातच काय करावं आणि काय करू नये? आपण उचलेलेलं पाऊल योग्य आहे की नाही? आपण निर्णय घेताना काही चूक तर नाही ना केली? असे नाना प्रकारचे विचार किंवा प्रश्न आपल्या मनात येतात. आणि हेच प्रश्न सोडवायचं काम या पुस्तकाने केलं आहे. यात मॅनिफेस्टशनच्या म्हणजेच स्वप्नपूर्तीच्या एकूण ७ पायऱ्या दिलेल्या आहेत. या सात पायऱ्यांचं पालन करून, त्यानुसार तुम्ही काम केलंत तर तुमची स्वप्न पूर्ण व्हायला याने मदत होईल.

या पुस्तकातून आपल्याला पूढील गोष्टी शिकायला भेटतात.

पाहिली गोष्ट की स्वप्न पूर्ण करताना केवळ “विचार करून स्वप्न पूर्ण होईल” अशा गोष्टी गृहीत धरून चालत नाही. बहुतांश लोकं काय करतात की मॅनिफेस्टशनला अत्यंत मर्यादित समजतात, की तुम्हाला काय हवंय याची केवळ कल्पना करा म्हणजे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पण खरं सांगायचं तर मॅनिफेस्टशन म्हणजे आपल्या इच्छांसाठी काम करणं, त्यासाठी योग्य ते निर्णय घेणं होय. आणि लेखिका आपल्याला इथे हेच सांगतात की तुम्हाला जर तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील, तर त्यासाठी कष्ट घेणे आणि स्वतःवर काम करणे अत्यंत महत्वाचे आहे.

पण तुम्हाला माहीत आहे का की बरेच लोक स्वतःमध्ये स्वयंशिस्त आणण्यासाठी स्वतःलाच त्रास देतात. जसे की अभ्यास करण्यासाठी आपण स्वतःला बंद करतो, अगदी काही लोक मर्यादेपेक्षा स्वतःवर मर्यादा आणतात. याला स्वतःवरच केलेले अत्याचार बोलतात. आणि लेखिका आपल्याला हेच सांगतात की आपली स्वप्न ही आपल्या सुखासाठी असतात, ती पूर्ण करताना स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःवर काम करा. स्वतःमधील नकारात्मक विचार स्वीकारा, आणि स्वतःमध्ये सकारात्मक विचार आणण्यासाठी प्रयत्न करा, स्वतः मधील असणारी भिती कमी करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी प्रयत्न करा.

जसं मी आत्ता सांगितलं की स्वप्न पूर्ण करण्यासाठी सकारात्मक विचार करणे खूप गरेचेचे आहे, पण त्यासाठी तुम्हाला इतरही गोष्टी कराव्या लागतील. जसे की “अफरमेशन.” अफरमेशन म्हणजे आपल्या मनातले नकारात्मक विचार करण्यासाठी जी वाक्य आपण मनात बोलतो किंवा लिहितो. जसे की एखादं पुस्तक वाचायचं माझं स्वप्न आहे पण ते महाग आहे तर मी “मला हे पुस्तक कधी वाचायला मिळणार? की मी हे पुस्तक कधी वाचू शकेल तरी का नाही?” असा नकारात्मक विचार करण्याऐवजी तुम्ही “मी इतके कष्ट करेल, पैसे कमवेल की हे पुस्तक मी एक ना एक दिवस नक्की खरेदी करू शकेल” असा विचार करण्यासाठी तुम्हाला अफरमेशन प्रवृत्त करतं. याने होतं काय की तुमचा आत्मविश्वास ही वाढतो, आणि तुमचं स्वप्न पूर्ण व्हायला मदत होते. या आणि अशाच अनेक गोष्टी या पुस्तकात दिलेल्या आहेत.

याशिवाय, आपण जेव्हा आपलं स्वप्न पूर्ण करायला जातो किंवा त्यासाठी पावलं उचलतो तेव्हा आपल्या मनात अनेक प्रकारच्या शंका कुशंका असतात, तर जो वर या शंका आहेत तो वर आपण पुढे कसे जाणार? आणि यामुळेच या लेखिकेने तुम्ही तुमच्या शंका कशा दूर कराल आणि पूढील वाटचाल कशी कराल हे सांगितलं आहे.

आपण आपल्या सवयींचे गुलाम असतो, सवयी दोन गोष्टी करतात. एकतर त्या तुमच्या उत्कर्षाचं कारण बनतील, किंवा तुम्हाला आळशी बनवतील. हे सर्वस्वी आपल्या हातात आहे की आपण काय करावं ते. मला माहीत आहे ज्या वेळी आपण आपल्यावर काम करायला सुरुवात करतो तेव्हा आपण आपोआपच आळशी बनतो, चालढकल ही करतो आणि आपल्या या सवयीच आपल्या स्वप्नांच्या आड येतात. आणि लेखिका आपल्याला इथे हेच सांगते की जे काही तुमचं स्वप्न आहे, त्याप्रमाणे तुम्ही वागा आणि तशा सवयी तुम्ही अंगीकृत करा. उदराहरणार्थ तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला ही जाणीव असली पाहिजे की तुम्ही एक व्यावसायिक आहात, आणि मग तुम्ही शिस्त, वेळेचे योग्य नियोजन अशा अनेक सवयी लावून घेऊ शकता. आणि या तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडतील हे निश्चित.

यासोबतच नशीब तुमची परीक्षा घेत असतं, खचण्याचे अनेक क्षण आयुष्यात येतात. त्यामुळे या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न कर. या आणि इतर गोष्टी जसे की ध्येय निश्चिती करणे, स्वतःवर काम करणे, इत्यादि गोष्टी त्यांनी आपल्याला यात सांगितल्या आहेत.

मॅनिफेस्टशन म्हणजे केवळ विझन बोर्ड एवढ्या पुरतं मर्यादित नाही तर त्याहीपेक्षा जास्त आहे हे आपल्याला या पुस्तकामुळे कळतं. अनेक प्रसारमध्यमांमध्ये मॅनिफेस्टशन या विषयावर अनेक विडीओ उपलब्ध आहे, पण हे पुस्तक खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहे. ज्या वेळी मला हा ब्लॉग सुरू करायचा होता त्यावेळी माझ्याही मनात अनेक अनेक प्रश्न होते, पण त्यासगळ्याचं निवारण करून मी हा ब्लॉग सुरू केला आहे. या पुस्तकाच्या प्रत्येक धडयात तुम्हाला काही ना काही ना काही कृती सांगितली आहे, ज्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष कृती करता. भाषा ही अत्यंत सोपी आहे, नवीन वाचकांना कळेल अशीच आहे. त्यामुळे स्वप्नपूर्तीकडे ज्याला ही वाटचाल करायची आहे त्याने नक्कीच हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे.

धन्यवाद!

Leave a Comment