| पुस्तक | डोपोमिन डिटॉक्स | लेखक | थिबॉट मॉरिस |
| प्रकाशन | विसडम ट्री | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | ८० | मूल्यांकन | ५/ ५ |
आपल्यापैकी प्रत्येकजण समाजमाध्यमांचा वापर नक्कीच करत असतो, खूप क्वचित लोकं आहेत जी त्याचा वापर करत नाही. त्याचा वापर करणं चुकीचं नाही पण त्याचा अतिवापर करून आपण आपला अमूल्य वेळ वाया घालवतो. खास करून विद्यार्थी वर्ग. त्यांना तंत्रज्ञानाचं आकर्षण आहे, आणि ए चांगलं ही आहे. पण अभ्यास न करता, कारण नसतानाही ते समाजमाध्यमांचा वापर करतात. ज्या कुणाला समाजमाध्यमांचं आकर्षण, मादक पदार्थ यांचं व्यसन, आरोग्याला उत्तम नसणाऱ्या पदार्थांचं सेवन अशा इत्यादि गोष्टी करायला आवडतात पण त्यांना हे माहीत असतं की हे त्यांच्यासाठी घातक आहे आणि तरीही ते या गोष्टी करतात, याचं कारण म्हणजे डोपोमिन होय.
लेखक थिबॉट यांनी डोपोमिन डिटॉक्स या आपल्या पुस्तकात अतिशय उत्तम, साध्या, सोप्या पद्धतीने आपला मेंदू कसा काम करतो? डोपोमिन म्हणजे नेमकं काय? हे सांगितलं आहे. जर थोडक्यात सांगायचं राहिलं तर डोपोमिन हे आपल्या मेंदूत तयार होणारं एक रसायन आहे, की जे आपल्याला खुश करणारं नव्हे तर आपण जे कम करतोय ते आपल्याला पुन्हा पुन्हा करण्यासाठी उत्तेजन देण्याचं काम करतं. म्हणजे एखादं काम आपल्याला पुन्हा पुन्हा करावं वाटतं, मग ते काम चांगलं असो वा वाईट, ते काम करून आपल्याला उत्साह मिळावा हा या रसायनाचा हेतु असतो. हे रसायन तसं वाईट नाहीये, पण पहा आपल्याला नेमक्या अशाच गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या वाटतात ज्या आपल्यासाठी घातक ठरू शकतात. जसे की “तुम्हाला माहीत आहे की आपल्यापैकी प्रत्येकजण समाजमाध्यमांचा वापर नक्कीच करत असतो, खूप क्वचित लोकं आहेत जी त्याचा वापर करत नाही. त्याचा वापर करणं चुकीचं नाही पण त्याचा अतिवापर करून आपण आपला अमूल्य वेळ वाया घालवतो. खास करून विद्यार्थी वर्ग. त्यांना तंत्रज्ञानाचं आकर्षण आहे, आणि ए चांगलं ही आहे. पण अभ्यास न करता, कारण नसतानाही ते समाजमाध्यमांचा वापर करतात. ज्या कुणाला समाजमाध्यमांचं आकर्षण, मादक पदार्थ यांचं व्यसन, आरोग्याला उत्तम नसणाऱ्या पदार्थांचं सेवन अशा इत्यादि गोष्टी करायला आवडतात पण त्यांना हे माहीत असतं की हे त्यांच्यासाठी घातक आहे आणि तरीही ते या गोष्टी करतात, याचं कारण म्हणजे समाजमाध्यमांचा अतिवापर आपला वेळ वाया घालवू शकतो, तुम्हाला माहीत आहे तळलेले पदार्थ जास्त खाल्ले तर तुमची तब्बेत बिघडू शकते, तुम्हाला माहीत आहे की व्यसन तुमच्या शरीराला पोखरतं पण तरीही ही तुम्ही ते व्यसन करता कारण ते तुम्हाला आवडतं”
तर आता आपण या पुस्तकाची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.
१) या पुस्तकाची भाषा ही अत्यंत सोपी आहे. मी एक मराठी वाचक आहे, त्यामुळे इंग्रजी वाचताना सतत एक भिती वाटायची की भाषा आपल्याला समजेल का नाही, वाचताना कंटाळा तर येणार नाही ना. आपल्या मेंदूबद्दल जाणून घेताना आपल्याला सतत असं वाटतं की काहीतरी अवघड भाषेतलंच वाचावं लागेल. पण या पुस्तकाने तो गैरसमज दूर केला. अगदी नववाचक ही हे पुस्तक आरामात वाचू शकतो इतकी याची भाषा सोपी आहे.
२) मला असं वाटतं की हे पुस्तक अशा प्रत्येकाने वाचावं की ज्याला समाजमाध्यमांचं खूप अतिप्रमाणात आकर्षण आहे. खास करून हे पुस्तक आजच्या पिढीसाठी लिहिलं आहे. या पुस्तकाच्या प्रत्येक धड्यामध्ये तुम्हाला एक कृतीपुस्तिका दिलेली आहे, ज्याचा वापर तुम्हाला डोपोमिनचे वाढलेले प्रमाण कमी करायला मदत होते. या कृती अतिशय सोप्या आहेत ज्या तुम्हाला पूर्ण करताना काहीच अडचणी येणार नाही. तुम्हाला तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी, किंवा कोणत्या गोष्टी तुमच्या स्वप्नांच्यामध्ये अडथळा बनल्या आहेत याची कल्पना येते हे ही या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे.
३) या पुस्तकातून तुम्हाला असे उपाय सांगितले आहेत ज्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात आणता येते. अवघड कृती सांगितल्या नाहीत जेणेकरून तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करताना जे अडथळे येतात ते दूर करायला मदत होते.
४) सर्वात शेवटची गोष्ट की हे पुस्तक खूप छोटं आहे. अगदी ५८ पानांचं पुस्तक आहे जे नववाचकासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण नवीन वाचक जेव्हा इंग्रजी वाचायचा विचार करतो तेव्हा त्याला सोपे आणि कमी पानांचे पुस्तक वाचणे गरजेचे आहे, जेणेकरून तुम्ही आणखीन इंग्रजी पुस्तकं वाचता तेव्हा तुम्हाला ते अवघड वाटणार नाही.
याशिवाय या पुस्तकातून आपल्याला पूढील गोष्टी शिकायला भेटतात:
१) काही गोष्टी या अशा असतात की ज्याचे परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगायला लागतात. या पुस्तकातून मला एक गोष्ट शिकायला भेटली आपण क्षणिक आनंदापेक्षा आयुष्यभर समाधान भेटेल अशाच गोष्टी करा. क्षणिक सुख तुम्हाला त्या त्या वेळेपूरतं खुश ठेवेल, पण तो आनंद काही क्षणात विरून जातो. मग तुम्ही परत त्याच गोष्टीकडे वळता. या पुस्तकातून आपल्याला ही गोष्ट कळते की कायम अशाच गोष्टींची निवड करा, ज्यामुळे तुम्हाला किंवा कोणालाही हानी पोहोचणार नाही.
२) यामध्ये “अति तिथे माती” याचे समर्थन कलेले दिसते. लेखकाने समाजमाध्यम वाईट आहे किंवा ते वापरूच नये असं सांगितलं नाहीये. याउलट लेखकाचे असे मत आहे की तुम्ही जी कोणती गोष्ट आहे त्याचे प्रमाण ठेवा. तुम्ही जरी समाजमाध्यम वापरत असाल तरी ते प्रमाणात वापरा. यासोबत कंटाळा येणे हा मानवी गुणधर्म आहे, पण तो कंटाळा झटकून तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता. कंटाळा ही वाईट नसतो, पण त्याला ही प्रमाण असते ते आपल्याला यातून सांगितलं आहे.
३) या पुस्तकाचं एक ध्येय आहे की ज्या गोष्टी तुमच्या स्वप्नांच्या आड येतात त्या दूर करा. तुम्हाला हे पुस्तक शिकवतं की ज्या गोष्टी वेळी तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करताना एखादी गोष्ट तुमच्या मार्गामध्ये अडथळा आणत असेल तर ती वेळीच ओळखा, त्याच्यापासून दूर होणं सुरुवातीला अवघड ही जाईल, पण हळूहळू त्याची सवय ही होईल. लक्षात ठेवा या गोष्टी तुमच्या चांगल्यासाठी आहेत, त्यामुळे त्या करताना तुम्हाला जरी त्रास झाला तरीही त्याचे परिणाम ही चांगलेच होणार आहेत.
अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला या पुस्तकात वाचायला भेटतील ज्याचा फायदा तुम्हाला आयुष्यभर होणार आहे.
आपल्याला कधीच पुन्हा-पुन्हा चांगल्या गोष्टी करायला आवडत नाही जसे की पुस्तक वाचणे, अभ्यास करणे, नवीन गोष्टी जसे की कला व कौशल्य शिकणे, या गोष्टी चांगल्या असूनही आपण त्या करत नाही कारण इतर गोष्टी आपल्या आयुष्यात अडथळा बनलेल्या आहेत. हा अडथळा दूर करणे सुरुवातीला अवघड वाटेल पण या पुस्तकात दिलेल्या कृतीकार्यक्रमांमुळे तुम्हाला हे करणं अतिशय सोप्पं जाईल. या पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगायचं तर हे एकूण ५८ पानांचं छोटसं पुस्तक आहे, अगदी एका दिवसात तुम्ही हे पुस्तक वाचू शकता. तुम्ही जर नवीन वाचक असाल आणि इंग्रजी वाचनाची नुकतीच सुरुवात करत असाल किंवा करायची असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी अगदी योग्य आहे.
हे पुस्तक कोणी वाचावं?
हे पुस्तक तसं प्रत्येकाने वाचावं असंच आहे. पण माझ्यामते विद्यार्थ्यांनी मात्र हे पुस्तक नक्की वाचावं. कारण हा काळ असा असतो की ज्यामध्ये तुमच्यात काहीतरी करून दाखवायचा उत्साह ही असतो, पण मार्गात अनेक काटे ही येतच असतात. त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी, आणि केवळ तुमच्या ध्येयकडे लक्ष देण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.
तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे का? या पुस्तकातून तुम्ही काय शिकला ते नक्की कळवा. या पुस्तकाची लिंक खाली दिली आहे, त्यावरून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता.
धन्यवाद!